घरातच होती… अचानक गायब झाली; 16 वर्षीय मुलगी बेपत्ता

फूस लावून पळविल्याचा पालकांचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: घरातच होती मात्र… अचानक गायब झाली; 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने मारेगावात खळबळ उडाली आहे. काही वेळानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच पालकांनी तिचा शेजारी, नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोध घेतला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर पालकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुलीचा शोध सुरू आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी हे मारेगाव येथील रहिवासी असून ते रोजमजुरीचे काम करतात. त्यांची धाकटी मुलगी (16) ही मारेगाव येथील एका कॉलेजमध्ये 11 व्या शिकते. मंगळवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ते घरी आराम करत होते. काही वेळाने ते झोपेतून उठले असता त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी त्यांच्या आईला याबाबत विचारणा केली असता मुलीच्या आजीने ती आता पर्यंत घरीच होती असे सांगितले. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती काही घरी आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी त्यांच्या मुलीचा शेजारी पाजारी व तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला. मात्र तिची कोणतीही माहिती त्यांना मिळाली नाही.

अखेर मुलीच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.