वनिता समाजाची महिलांसाठी कार्यशाळा

पुणे येथील समुपदेशक मार्गदर्शक श्रीकांत पोहनकर यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

0
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः सोमवार दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी वनिता समाज वणी तर्फे श्री जैताई देवस्थान सभागृहात ”नाही कसं म्हणू तुला?” ही खास महिला व तरूणींसाठी कार्यशाळा घेण्यात आली.पुणे येथील समुपदेशक मार्गदर्शक श्रीकांत पोहनकर यांनी प्रात्यक्षिकांसह उत्तम मार्गदर्शन केले. महिलांनी अत्याचार होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन तसेच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संचलन व प्रास्ताविक अंजली भट यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा. म.गो. खाडे  यांनी करून दिला. कार्यक्रमाला चर्चेमुळे व महिलांनी विचारलेल्या शंकांमुळे उत्तम प्रतिसाद मिळाला.वणी शहरातील बहुसंख्य महिलांची हजेरी यावेळी होती. आभार अर्चना कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वनिता समाज वणीच्या अध्यक्ष सौ.भारती सरपटवार व सर्व पदाधिका-यांनी सहकार्य केले.
Leave A Reply

Your email address will not be published.