पैनगंगेचे स्रोत बंद, मुकुटबनला पाणी टंचाईचे चटके

बोअर मारून सरपंचांनी सोडवली समस्या

0

झरी (सुशील ओझा): झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १५ हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन गावाला पानी टंचाईचे चटके भासू लागले आहे. एक महिन्यापूर्वी वार्ड क्र २ मध्ये पाणीपुरवठा करणारी बोअर आटली. ज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली होती. परंतु सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्वरित निर्णय घेऊन दीपचंद तातेड़ यांच्या घराच्या बाजूला बोअर मारून पाण्याची समस्या मिटवली. परंतु गेल्या २० दिवसांपासून पैनगंगा नादीतील स्त्रोत बंद झाल्याने गावातील पाणी प्लांटवर पाणी येणे बंद झाले.

पैनगंगेचा स्त्रोत आटल्याने वार्ड क्रमांक १, ३ व ५ मधील पाणीपुरवठा पूर्ण ठप्प झाला होता. तिन्ही वार्डामधील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामपंचायत समोर मोठे आव्हान उभे झाले होते. या प्रश्नावर सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव जाधव यांचेसह सर्व एकत्र येऊन पाणी प्लांटजवळ बोअर मारण्याचा निर्णय घेतला. त्या जागेवर ३ बोअर मारण्यात आले.

या तीनही बोअरला भरपूर पाणी लागले. ज्यामुळे वार्ड क्र १, ३ व ५ मधली पाणी समस्या सोडविण्यात यश आले आहे. सरपंच, उपसरपंच, सचिवासह सदस्यांची ग्रामवासींयामध्ये प्रशंसा केली जात आहे. मुकुटबन ग्रामवासीयांना पाण्याची कमी भासु देणार नाही मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सरपंच शंकर लाकड़े यांनी वणी बहुगुणीला सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.