कवी-लेखकांना सुवर्णसंधी, जुळा ‘वणी बहुगुणी’शी
हौशी कवी आणि लेखकांना साहित्य पाठवण्याचं आवाहन
वणी: ‘वणी बहुगुणी’ हे आपलं न्यूज पोर्टल असल्यानं यात वणीकर आणि वणीशी जुळलेल्या व्यक्तींचा अधिकाधिक समावेश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या साहित्याला फोरम उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही परिसरातील लेखक, कवी यांना आवाहन करीत आहोत.
काय आहे ‘बहुगुणी कट्टा’ ?
वणी आणि परिसरातील तसंच वणीशी जुळलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कॅटेगिरी आहे. या कॅटेगिरीमध्ये फक्त आपण लिहिलेले कविता, लेख, तुम्ही बनवलेल्या शॉर्टफिल्म, तुम्ही गायलेलं गाणं. सोलो ऍक्टिंग, स्टँडअप कॉमेडी, रांगोळी, पेंटिंग्ज, हस्तकला. इत्यादींचा समावेश असतो. तुम्ही लिहिलेल्या कविता, लेख तसंच तुमच्या जवळ असलेल्या कलेबद्दल माहिती देण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. तुमच्यात असलेल्या कला गुणांना ‘वणी बहुगुणी.कॉम’ या वेबसाईटवर स्थान दिलं जाईल.
आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी, तसंच परिसरातील न्यूज देण्यासाठी, वणी बहुगुणीचे प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क:
निकेश जिलठे: 9096133400
सुनील इंदुवामन ठाकरे: 8623053787
Email id: wanibahuguni.news@gmail.com