विवेक तोटेवार, वणी: कुस्ती हा खेळ प्रामाणिकपणा आणि जिद्दीचे दर्शन घडवतो. वणीत विदर्भस्तरीय स्पर्धा होत आहे याचा मला अभिमान आहे. आजच्या धकाधकीच्या जिवनात कुस्ती बघताना मी सर्वकाही हरवून जातो. मल्लांनी खेळामध्ये शक्तीप्रदर्शन करताना प्रेक्षकांचे मनोरंजन करावे. सोबतच खेळभावना देखील जागृत ठेवावी. हा खेळ आंतराष्ट्रीय असल्याने मल्लांनी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवावे. असे प्रतिपादन केंद्रीय हंसराज अहिर यांनी केले. संध्याकाळी साडे आठला विदर्भ केसरी या स्पर्धेचे केंद्रीय गृहराज्यमत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते वणीतील जत्रा मैदानात उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धेचे खासदार रामदास तडस होते तर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर होते. उद्घाटन प्रसंगी नगर पालिकेच्या स्वर्गरथाता अनावरण सोहळा देखील घेण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात वर्धेचे खासदार रामदास तडस म्हणाले की कुस्तीगीर आजही हा पारंपरिक खेळ टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मल्लांना सरकारी नोकरीमध्ये काही जागा राखीव ठेवणे गरजेचे आहे, अशी मागणी केली. खा. तडस यांच्या मागणीला खा. अहिर यांनी मान्यता देत मल्लांना सरकारी नोकरीमध्ये राखीव जागा ठेवण्याचे आश्वासन दिले. उद्घाटन झाल्यानंतर रात्री 9.30 ला उद्घाटनीय लढत झाली.
शुक्रवारी 15 लढती झाल्या. या स्पर्धेची उद्घाटनीय लढत 54 गटात मोहित दंडेले चंद्रपूर शुभम जाधव वाशिम यांच्यात झाली. यात चंद्रपूरचे मल्ल मोहित दंडेल विजयी ठरले. महिला गटात गिता चौधरी, अमरावती आणि आरती काकण, भंडारा यांच्यात लढत झाली. या लढतीत गीता चौधरी विजयी ठरल्या. तर 42 किलो कुमार गटात गौरव खडसे, अमरावती यश राठोड यवतमाळ यांच्यात लढत झाली. स्पर्धेसाठी पंच म्हणून अमरावतीचे मनोज तायडे यांनी काम पाहिले. आज शनिवारी सुमारे 150 लढत होण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत खुल्या स्पर्धेत 70 किलो गटात 8 मल्ल, 65 किलो गटात 8 मल्ल आणि 57 किलो गटात 10 मल्ल असे एकुण 26 पुरुष मल्ल सहभागी झाले आहेत. तर 53 किलो गटात 9 पुरुष व 61 किलो गटामध्ये 10 पुरुष सहभागी झाले आहेत. कुमार गटात 50 किलोमध्ये 11 पुरुष, 54 किलो गटात 8 पुरुष, 46 किलो गटात 10 पुरुष, 42 किलो गटामध्ये 8 मल्ल सहभागी झाले आहेत. तर महिला गटात 51 किलोमध्ये 10, 48 किलो गटामध्ये 6, 44 किलो गटामध्ये 10, 40 किलो गटामध्ये 10 आणि 55 किलो गटामध्ये 6 महिला सहभागी झाल्या आहेत. यात वणीत दोन महिला मल्लांचादेखील समावेश आहे. स्पर्धेत एकूण 65 महिला, पुरुष गटात 63 मल्ल, तर कुमार गटात 38 सामिल झाले आहेत. तर लाट (खुली) मध्ये 80 पुरुष मल्ल सहभागी झाले आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले तर संचालन जयंत सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन विजय थेरे यांनी केले. आज सुमारे 150 लढती होणार असून वणीकरांनी ही स्पर्धा पाहण्याकरीता मोठ्या संख्येने यावे असे आवाहन वणी नगर पालिका आणि नृसिंह व्यायाम शाळेतर्फे करण्यात आले आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा एक थरारक लढत…