सुशील ओझा, झरी: तालुका विधी सेवा समितीद्वारे झरी न्यायालयात 22 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरिबांना त्रास कमी होऊन अंगावरील केसेस कमी करणे व न्यायालयात होणाऱ्या धावपळीतून मुक्त करण्याच्या उद्देशाने या लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील स्टेट बँक, विदर्भ कोकण बँक, वीज वितरण कंपनी, मोटर वेहिकलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात लोकांच्या तक्रारी संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांशी तडजोड करून प्रकरणाचा निपटारा करायचा असतो.
लोक अदालतीत स्टेट बँकेचे 3, विदर्भ कोकण बँक 2 असे 5 केसेसचा निपटारा करण्यात आला. यात दोन्ही बँकेचे मिळून 3 लाख 189 रुपये वसूल झाले. तर मोटर व्हाईकलचे 39 केसेसचे 24 हजार 200 व विज वीतरण कंपनीचे 1 केस 18 हजार 320 असे एकूण 3 लाख 42 हजार रुपये वसूल झाले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश के जी मेंढे होते तर ऍड दीपक काटकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, प्रफुल डाहुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी न्यायालयीन व पोलीस कर्मचारी बोबडे(नाजर), वरिष्ठ लिपिक बलकी, पोटे, दोहतरे, वरहनकर व शिपाई थोडगे, उमेश डोंगरे, रमेश ताजने, प्रदीप कवरासे, पाथोडे, उपरे यांनी परिश्रम घेतले.