महाराष्ट्रदिनाला माय माऊली सन्मान सोहळा

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे ‘माझी आई’ विषयावर मंगळवारी यवतमाळ येथे व्याख्यान

0

 

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: ‘माय माऊली गौरव समिती’च्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या दि. 1 मे रोजी जिल्ह्यातील पाच आईंचा माय माऊली सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सुप्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे ‘माझी आई’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येथील पोस्टल मैदानावर सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी तथा श्री गुरूदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक रामधनजी महाराज राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महसूल राज्यमंत्री तथा माय माऊली गौरव समितीचे निमंत्रक ना. संजय राठोड, नगराध्यक्षा कांचन बाळासाहेब चौधरी, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, विश्वास नांदेकर, प्रकाश पाटील देवसरकर उपस्थित राहणार आहेत.

रेणुका वऱ्हाडे, रा. घाटंजी, सुनीता मडावी, रा. यावली, ता. बाभुळगाव, त्रिशला कांबळे, रा. ब्राह्मणवाडा पूर्व, ता. नेर, सुंदलबाई चव्हाण, रा. पुसद आणि गंगूबाई कंठाळे, रा. यवतमाळ यांना माय माऊली सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी हिराचंद रतनचंद मुणोत ट्रस्टचे सचिव रमेश मुणोत यांना ‘सेवाव्रती सन्मान’ बहाल करण्यात येणार आहे. यावेळी आई विषयावरील कविता व गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. नागरिकांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक पराग पिंगळे, संतोष ढवळे यांच्यासह आयोजन समितीचे आनंद कसंबे, नितीन पखाले, संदीप तातेड, पद्माकर मलकापूरे, नितीन भागवते, अनिरूद्ध पांडे, डॉ. महेश चव्हाण, प्रवीण निमोदिया, जयंत चावरे, ॲड. वीरेंद्र दरणे, जितेंद्र सातपुते, योगेश भांदक्कर, ॲड. अभिजित बायस्कर, अनंत कौलगीकर, जीवन लाभसेटवार, प्रवीण कापर्तीवार, मंदा गाडेकर, निर्मला विणकरे, सागर पुरी, अल्का कोथळे यांनी केले आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.