१० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

सुशील ओझा, झरी:- पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पारंबा (कारेगाव) येथील आरोपी नामदेव सीताराम मडावी वय ४० वर्ष याने गावतीलच एक १० वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे ला  सायंकाळी आपल्या घराजवळ खेळत असताना त्या मुलीला जबरदस्तीने उचलून आपल्या कवेत घेऊन गावतीलच गल्ली बोळात नेऊन अश्लील चाळे केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही माहिती माहिती कळताच पीडित मुलीच्या आईने थेट पाटण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी नामदेव विरुद्ध ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल डाउले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.