‘कामाला लागा, तिकिट राष्ट्रवादीलाच’: मुंडे

धनंजय मुंडे यांची डॉ. लोढा यांना ग्वाही

0

निकेश जिलठे, वणी: लोढा साहेब तुम्ही तिकीटाची चिंता करू नका. तुमचे परिसरातील काम असेच सुरू ठेवा. तिकिटाचे आमच्यावर सोडा. प्रसंगी मी स्वत: परळीची जागा सोडेल, मात्र वणी मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे खेचून आणेल, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी डॉ. महेंद्र लोढा यांना दिली. पुढे ते म्हणाले की मी त्यांचा बालमित्र आणि एक भाऊ म्हणून सोबत आहेच मात्र त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी माझ्यासहीत राष्ट्रवादीची अख्खी फौज उभी करेल असे वचन देखील त्यांनी दिले. बुधवारी वणीतील शेतकरी मंदिरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजीने उपस्थितांचे मन जिंकले. अच्छे दिनचे स्वप्न, पेट्रोलभाववाढ, महागाई, 15 लाख, काळा पैसा अशा विविध विषयांवर त्यांनी सरकारची खरडपट्टी काढत सरकारवर हल्ला चढवला. सोबतच त्यांनी परिरसरातील लोकांना डॉ. लोढा यांना साथ देण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की माझी आणि धनंजय मुंडे यांची जन्मभूमी एकच. सत्ताधारी नाकर्ते निघाल्याने मला काम करावे लागत आहे. राजकारणी नाही. माझी वाटचाल समाजकारणातून सुरू आहे. आजपर्यत तब्बत 150 च्या वर गावे दत्तक घेतली. लोकसहभागातून, श्रमदानातून, लोकवर्गणी काढून त्याला आर्थिक मदत करून माझे कार्य सुरू ठेवले. हे याआधी  कोणत्याही राजकारण्यांना जमले नाही. ते तुमच्या साथीने तुमच्या सहभागाने मला करता आले. जनतेचे प्रश्न सोडवणे, शेतकरी शेतमजूर आदिवासी यांचे प्रश्न सोडवणे हे माझे उद्धीष्ट आहे. या कामासाठी मला सर्वसामान्यांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ देण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये सामिल व्हा असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्डे होते. या मेळाव्यात दिग्रसचे आमदार प्रा. ख्वाजा बेग, आ. प्रकाश गजभिये रा. काँ. चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, महिला रा.काँ.च्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, शंकरराव राठोड, अशोकराव घारफळकर, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, आरती फुफाटे, जयसिंग गोहोकार, मंगल चिंडालिया, राजाभाऊ बिलोरिया, विजया आगबत्तलवार, संगीता खटोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये, यांनी मनोगत व्यक्त करत डॉ. लोढा यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले.

सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे यांचे वणीत आगमन झाले. सर्वप्रथम धनंजय मुंडे यांनी पुनवट येथे भेट दिली. तिथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्यात रसायनाचं प्रमाण आहे. त्यामुळे तिथे डॉ. लोढा यांच्या सौजन्याने जलशुद्धीकरण यंत्र देण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 11:30 वाजता धनंजय मुंडे यांचे शिवतीर्थावर आगमन झाले. यावेळी त्यांचे वाजतगाजत, फटाक्याची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंडे यांच्या हस्ते मारेगाव येथील रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर शिवतीर्थ ते राष्ट्रवादीचे कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. यात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

लवकरच अजित पवारांचा वणी दौरा

वणी आणि परिसरात डॉ. लोढा यांना असलेला जनसामान्यांचा पाठिंबा प्रत्यक्षात बघता आला. लोकांचा डॉ. लोढांना असलेला पाठिंबा बघून मी भारावलो असून याचा सर्व रिपोर्ट अजित पवार यांना दिला जाईल. तसेच त्यांची लवकरच तारिख घेऊन त्यांना वणी दौरा आखला जाईल. तेव्हा यापेक्षा मोठा आणि जंगी कार्यक्रम घेण्याच्या तयारीला लागा अशी सूचना धनंजय मुंडे यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले तर संचालन यांनी केले. आभार प्रदर्शन जयसिंगजी गोहोकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ बिलोरिया, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, संगिता खटोड, स्वप्नील धुर्वे, प्रा. मत्ते, सूर्यकांत खाडे, संजय जांबे, शुभांगी गडवाल, अंकुश माफुर, रवि येमुर्ले, सोनू निमसटकर, संतोष गोमकर नितिन गोडे पाटील, राहुल झट्टे, अजित, प्रविण, नितिन, अमोल, यांच्यासह राष्ट्रवादीचेे कार्यकर्तेे, तसेच डॉक्टर असोसिएशन्सचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील हजारों कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.