वणी: डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे व कुलबर्गी यांचे मारेकरी पकडण्यात शासनाला अपयश आलं आहे. याबाबत न्यायालयानं वारंवार ताशेरेही ओढले आहे. मात्र तरीसुद्धा याप्रकरणाचा तपास अजूनही धिम्यागतीनं सुरू आहे. याविरोधात वणीत 20 जुलै गुरुवारी भव्य निषेध रॅली काढण्यात येणार आहे. अशी माहिती अंनिसचे डॉ. हमिद दलवाई यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृहात आले असताना त्यांनी ही माहिती दिली.
वणीतील शासकीय विश्राम गृहात डॉ. हमिद दाभोलकर यांच्या नेतृत्वात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत 20 जुलैला निषेध रॅली काढण्याचं ठरलं. मारेकऱ्यांचे फोटो लावून ही निषेध रॅली काढण्यात येणार आहे.
बैठकीला शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदविला होता. प्रसंगी डॉ हमीद दाभोळकर, श्रीखंडे, सुरकर देवेंद्र बच्चेवार. संजय साखरकर, गौरकार ,आंनद शेंडे, चंद्रकांत वैद्य, सह बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते. हमीद दाभोळकर विश्रामगृह येथे येताच ठाणेदार मुकुंद कुळकर्णी पोलीस ताफ्यासह उपस्थित झाले होते.