मुकुटबन पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलित करण्याचे निर्णय घेतले आहे. तालुक्यात वनविभाग तर्फ़े तसेच शासकीय निमशासकीय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, द्वारे ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मुकुटबन पोलीस ठाण्यात वृक्ष लागवड करण्यात आली.
ठाण्याच्या परिसरात ४० वेगवेगळ्या प्रकारची झाडे ठाणेदार धनंजय जगदाळे सह पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सुशील ओझा, सह पोलीस कर्मचारी सुधाकर मत्ते, प्रवीण ताडकोकुलवार, रमेश ताजने, मारोती टोंगे, अशोक नैताम, संदीप सोयाम, सुलभ उईके, नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे,रमेश मस्के, राम गदडे, सागर मेश्राम, मोहन कुडमेथे, निलेश पेंडारकर, रंजना सोयाम, योगिता चटकी, दुधना मेश्राम, प्रीती पोयाम यांच्या हस्ते लावण्यात आले.