सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन परिसरात दोन कोळसा खदान असून, कोळसा वाहतूक करण्याकरिता जड वाहनांचा वापर होत आहे. खदानीमुळे प्रदूषणात वाढ झाली असून, जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील जड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवादी युवकांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. .
कोळसा खदानीतून जड वाहनात कोळसा भरून वाहतूक करताना दिसत आहे. यामुळे शहरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या वाहनांची धूळ रस्त्यालगतच्या दुकानात जात आहे. यामुळे दुकानदारांसह ग्राहक आजारी पडत असून, त्रास सहन करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत जड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदन देताना गणेश मुद्दमवार, गोकुल जुमनाके, चेतन मँकलवार, प्रफुल्ल भोयर, केतन ठाकरे, प्रियल पथाडे, जयंत उदकवार, पंकज मुद्दमवार, श्रीनिवास मँकलवार, अप्रीत वाघमारे, अनिकेत टोंगे उपस्थित होते.