धीरज डाहुले, शिरपूर: शनिवारी शिरपूर येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आणि गावातील मोकळ्या मैदानात कैलास क्रिकेट क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हा वृक्षरोपणाचा पहिला टप्पा असून यानंतर दुस-या टप्प्यात आणखी झाडं लावण्यात येणार आहे.
सध्या गावोगावी महाराष्ट्र शासनाचा वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शिरपूरमध्येही शनिवारी दुपारी गावातील कैलास क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी 25 झाडे लावली. तसेच प्रत्येक सदस्यांनी एक झाड दत्तक घेऊन झाडाचे पालन आणि संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या वृक्षरोपणात करंजी, अर्जून, सप्तपर्णी, रेनट्री इत्यादी वृक्षरोपणाची झाडे लावण्यात आली.
यावेळी गावाच्या सरपंच मिनाक्षी कनाके, उपसरपंच सुभाष नीर, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी वाभीटकर यांच्यासह रमेश बरडे, दिलीप मंदे, रमेश पाचभाई, विलास चामाटे, अतुल भोयर, राघो टेकाम, कुणाल ठाकरे, सूरज बोरसडे, लोकेश पाचभाई, हर्षल घोंगे, गणेश डहाके, महेश वाढिबा, मोहित चचडा, गणेश पाचभाई, हर्षल वाभीटकर, सुमीत निकुरे, अभिजीत नागपुरे, पवन लेनगुरे, संदीप मांढरे, अजय, कोल्हेकार, अक्षय खोबरे, गौरव बोभाटे, मदन निब्रड, मनिष घोरुडे, परवेज शेख, सचीन पाचभाई, राजू निकुरे, चेतन निब्रड, पवन घोंगे तसेच कैलास क्रिकेट क्लबचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.