अखेर वणीतील निलंबीत नायब तहसिलदार रूजू

जिल्हाधिकारी व तहसिलदारांना आयुक्तांची चपराक

0

वणी: वणी तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेल्या विजय मत्ते यांना 19 एप्रिल रोजी निलंबीत करण्यात आलं होतं. कामात हयगय करणे, कामाचा रेकॉर्ड न ठेवणे, वेळेवर कामे न करणे आदी बाबींचा ठपका ठेवून त्यांना निलंबीत करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं असून ते आता रुजू झाले आहे.

विजय मत्ते 2014 पासून नायब तहसिलदारपदावर कार्यरत आहे. मत्ते यांनी 2014 मध्ये नायब तहसिलदार पदाचा कार्यभार सांभाळत विधानसभा निवडणूक, नगर पालीका निवडणूक तसेच ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा काम बघितलं आहे. मात्र स्थानिक अधिका-यांनी कुरघोडी करीत मत्ते यांच्या निलंबनाचा थेट प्रस्ताव तयार करून जिल्हाधिका-यांना सादर केला. जिल्हाधिकारी यांनी कोणताही चौकषी अहवाल न मागता निलंबनाचा आदेश दिला.

नायब तहसिलदार यांना निलंबीत करण्याचे अधिकार नियुक्ती अधिका-यांना आहे. तसंच पदावर कार्यरत असतांना प्रथम चौकशी करणे, वरिष्ठांना अहवाल सादर करणे गरजेचं आहे. मात्र नियमांचं उल्लंघन करीत वणी निवडणूक विभागातील नायब तहसिलदार विजय मत्ते यांना निलंबीत करण्यात आलं होतं.

(डोंगरगाव(दहेगाव) रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांचे हाल)

आयुक्तांनी सदर प्रकरणावर लक्ष केंद्रीत करून नायब तहसिलदार मत्ते यांचे निलंबन चुकीचं असल्याचा ठपका ठेवला. त्यांनी निलंबनाचा आदेश रद्द करीत पुन्हा त्यांना कामावर रूजू करून घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे तहसिलदार आणि जिल्हाधिका-यांना चांगलीच चपराक बसलीये.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.