वणीतील पुल व रस्त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर

वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील कामांसाठी 337 कोटी

0

बहुगुणी डेस्क: राज्य महामार्गावरील रस्ते आणि पुलाच्या बांधकामासाठी वणी विधानसभा क्षेत्रासाठी 336.85 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी मंजूर केला आहे.

यवतमाळ जिल्हयातील राज्य महामार्ग 315 वरील झरी तालुक्यातील बोरी-पाटन-मुकूटबन रस्त्याच्या बांधकामासाठी रू. 84.10 कोटी, वणी तालुक्यातील राज्य महामार्ग 319 वरील वणी-कायर-पुरड रस्त्याच्या दुरूस्तीसाठी 58.75 कोटी, चंद्रपूर जिल्हयातील वनोजा सीमेवरील वणी तालुक्यातील चारगाव-शिरपूर-कळमना या मार्गाच्या दुरूस्तीकरिता 55 कोटी, राज्य महामार्ग 317 वरील मारेगाव व वणी तालुक्यातील खैरी-वडकी- मार्डी-नांदेपेरा-वणी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी रू. 54 कोटी मंजूर करण्यात आले आहे.

चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयास जोडणारा सुमठाणा-वणी या वर्धा नदीवरील पुलाच्या बांधकामाकरिता रू. 20 कोटी रूपयांच्या कामास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. राज्य महामार्ग 267 वरील घाटंजी ते पारवा रस्त्याचे बांधकाम तसेच राज्य महामार्ग 273 वरील घाटंजी अॅप्रोच रत्याच्या बांधकामासाठी रू. 65 कोटी,

या राज्य महामार्गावरील रस्त्यांच्या बांधकामाकरिता सन 2018-19 करिता रू. 507.85 कोटी रूपयांचा केंद्रीय रस्ते निधी मंजूर करून घेतला आहे. यातील 336.85 कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्यातील कामांसाठी तर 171 कोटी रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील कामांसाठी आहे. या रस्त्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश केंद्रीय भुपृष्ट वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.