रासायनिक खते नवीन दरानेच खरेदी करण्याच्या शेतक-यांना सूचना
जीएसटीमुळे रासायनिक खतं झाले स्वस्त, बिलावर जीएसटीचा उल्लेख करणे अनिवार्य
वणी: केंद्र सरकारनं जीएसटी लागू केल्यानं रासायनिक खतांवर सरसकट 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. परिणामी महाराष्ट्रातील रासायनिक खतांच्या किमती 1 जुलैपासून कमी झालेल्या आहे. त्यामुळे खत विक्रेत्यांनी शेतक-यांना बील देते वेळी मूळ किंमत आणि 2.5 टक्के सीजीएसटी आणि 2.5 टक्के एसजीएसटीचा समावेश करणे आवश्यक आहे.
अनेक कृषी केंद्राकडे जुन्या दराचे अनुदानित खत साठा शिल्लक आहे. त्यांना देखील आता नवीन दरानेच विक्री करणे बंधनकारक असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. जर एखादा व्यापारी जुन्या दरानं विक्री करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.
काय आहे खतांचे नवीन दर ?
कृभको 1076