सुशील ओझा, झरी: ट्रकमधून जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पिंपळखुटी चेकपोस्टवर ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी १४ जुलैला मध्यप्रदेशातील सारंगपूर जि. राजगड येथून ट्रकमध्ये (एम.पी. १७ एचएच १८०३) ३५ जनावरे कोंबण्यात आले होते. या जनावरांना हैद्राबादला घेऊन जात होते. दरम्यान पिपंळखुटी चेकपोस्टवर ट्रकचा काटा करण्यात आला. यात पोलीस व सद्भाव कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे ट्रकची झडती घेतली असता, तोंड व पाय बांधून असलेले ३५ जनावरे आढळली.
पोलिसांनी जनावरांची सुटका करून मांडवी येथील चैतन्य गोरक्षामध्ये रवाना करण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकांसह चौघांना ताब्यात घेतले. चालक अब्दुल हक खा सत्तार, चालक शब्बीर खा हबीब खा, नासीर मुबारीस खान, साबिर सैय्यद खान अशी आरोपींची नावे आहे. ही कारवाई पीएसआय घाटोडे, सुहास मंदावार, उमेश कुमरे, पी. सी. भांदक्कर, जमादार मुंडेकर, जाधव, रोडगे यांनी केली.