आणि दगडांची बदलली भाषा… मिटवले गावांचे नाव

वणी बहुगुणी इम्पॅक्टः शिंदोला मार्गावरील माईलस्टोनमध्ये दुरुस्ती

0

विलास ताजणे,  मेंढोली: ‘‘वणी बहुगुणी डॉट कॉम’’वर शिंदोला मार्गावरील माईलस्टोनची “अबब! शिरपूरपासून शिंदोला चक्क 190 किलोमीटर!” या शीर्षकाची बातमी झळकली. अत्यंत वेगाने पसरेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली. व लगचे काही तासांत या माईलस्टोनवरील चुकीच्या दुरूस्ती करण्यात आली असून यावरील गावांचे नाव मिटवण्यात आले आहे. मात्र अद्याप पूर्ण काम होणे बाकी आहे.

बातमी झळकताच झोपलेले साबांवि खडबडून जागे झाले. अवघ्या चार तासांमध्ये त्यांनी कामाला सुरूवात केली. दुपारी चार वाजताच्या दरम्यान किलोमीटरवर लिहिलेले गावांचे नाव पेंटने पुसण्यात आले. मात्र यातही किलोमीटर पुसण्याऐवजी गावाचेे नाव पुसण्यात आले आहेे. त्यामुळे यानंतर इथे दुसरे गाव लिहायचे आहे की आणखी काही हे प्रशासनलाच माहिती. मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे यांनीदेखील चूक दुरस्त करण्याची मागणी केली होती.

या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे.

शिरपूरपासून शिंदोला कळमणा हे अंतर 190 किलोमीटर दाखवण्याचा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला. शिरपूरपासून जसजसे शिंदोल्याकडे जाणार तसतसे हे अंतर पुढे 191 किमी, 192 किमी असे वाढत जाते. या प्रकारामुळे चालकांची चांगलीच तारांबळ उडायची. ही गंभीर बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आली नव्हती.

आधीचे चुकीचे आकडे असलेले दगड

वणी ते शिंदोला हे अंतर सुमारे 30 किलोमीटरचे आहे. शिरपूरपासून शिंदोल्याचे अंतर हे 17 किलोमीटर आहे. त्यामुळे माईलस्टोनवर (किलोमीटर दर्शवणारा दगड) 17 किलोमीटर हे अंतर लिहिणे गरजेचे होते. मात्र या माईलस्टोनवर चक्क 190 किलोमीटर अंतर दाखवण्यात आले होते. कळस म्हणजे ही चूक एकदा नाही. पुढे हे अंतर 191 किमी, 192 किमी असे वाढत गेली. तर दगडाच्या दुस-या बाजूला वणीकडे जाणा-या दिशेने वणीचे अंतर योग्य लिहिले आहे.

उन्हाळ्यात वणी शिंदोला हा रस्ता तयार करण्यात आला. 15 दिवसांआधी या नवीन तयार झालेल्या मार्गावर माईलस्टोन लावण्यात आले. शिरपूरपर्यंत माईलस्टोन बरोबर आहे. मात्र शिरपूरनंतर हे अंतर चुकीचे लिहिण्यात आलेले होते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र चुकीचे किलोमीटर दर्शक लावल्याने चालकांची तारांबळ उडण्याची शक्यता होती.

अशी झाली चूक…
माईलस्टोनवर समोरच्या दिशेने गावाचे अंतर लिहिले जाते. तर त्याच्या बाजूला म्हणजे जाडी असलेल्या दगडावर किती दगड लावले याची संख्या लिहिली जाते. मात्र पेंटरने जाडीवर लिहिण्यात येणारी दगडाची संख्या किलोमीटरच्या जागेवर लिहीली आहे. शिरपूरपर्यंत 190 माईलस्टोन लावण्यात आले आहे. 190 ही संख्या दगडाच्या जाडीवर तर लिहिली लिहिली. सोबतच हीच संख्या किलोमीटर लिहिण्याच्या जागेवरही लिहीली होती. ‘‘वणी बहुगुणी’’च्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.