गुरूपौर्णिमेनिमित्त वणीत रोगनिदान व उपचार शिबिराचं आयोजन
साई सेवा समिती देशमुखवाडीच्या वतीने विविध शिबिरं
बहुगुणी डेस्क: साई सेवा समिती देशमुखवाडीच्यावतीने गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 27 जुलैला नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये रोगनिदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सोबतच मोफत नेत्र तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे.
साई सेवा समितीद्वारे शाळा क्रमांक 7 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोगनिदान शिबिरात स्त्रीरोग, शल्य, हृदयरोग, मधुमेह, बालरोग, अस्थिरोग, दन्तरोग, इत्यादी रोगांवर त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहे. सोबतच काँटाकेअर आय
हॉस्पिटल द्वारा रुग्णांची नेत्र तपासणीही करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना अत्यल्प भावात चष्मा दिला जाणार आहे.
शिबिरात मोफत औषधींचे वाटप
या शिबिरात केमिष्ट अँड ड्रॅगीस्ट असोसिएशनच्या वतीने मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. सोबतच जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर तर्फे रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे. तरी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अखिल सातोकर यांनी केले आहे.