सुशील ओझा, झरी: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रूढी परंपरेनुसार आषाढी एकादशी निमित्ताने बाजीराव महाराज यांच्या तेलंगणातील भेदोळा या जन्मगावातून पायदळ वारीची ही परंपरा सुरू आहे. तेलंगणातील बाजीराव महाराजांची पालखी पायदळ अनंणतपुर मार्गाने पाटण, मुकुटबन व कायर या गावात पालखीसह भक्तगण मुक्काम करीत वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील महाराजाच्या समाधी स्थळाला भेट देऊन पालखीचे समारोप करण्यात येते.
दरवर्षी प्रमाणे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी बाजीराव महाराजाचे देवस्थान सज्ज होते. तर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व भोजनाची व्यवस्था केलेली असते. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी भाविकांची बरीच गर्दी सुकनेगावमध्ये उसळलेली असते. दर वर्षी बाजीराव महाराजांची वारीचे व पालखीचे वेळापत्रक अगोदरच तयार होते.
सुरुवातीचे स्थान, जेवण, विश्रांती, रात्री मुक्कामाचे स्थान, वेळ यांचे सुस्पष्ट तपशील त्यामध्ये असतात. वारकऱयांसाठी लागणारे जेवण, रात्रीच्या विश्रामासाठी मंदीर आदी सर्वाची तयारी अगोदरच केली जाते. संत बाजीराव महाराजांची पालखी ही ता. 22 जुलै ला भेंडोळा येथून प्रस्थान होऊन 26 जुलै ला सुकनेगाव ला मुक्कामी असते.
भक्तगण या वारीदरम्यान विठ्ठलाची सेवा म्हणून या वारकऱ्यांची सेवा करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मदत सुद्धा करतात. मुकूटबन येथिल सरपंच शंकर लाकडे यानी वारकर्यांची नास्ता, चहा व राहण्याची व्यवस्था केली तर भालचंद्र बरशेट्टीवार यांनी रात्रीच्या जेवनाची व्यवस्था केली. आषाढी एकादशीच्या दिवशी सुकनेगाव येथे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.