कृषी उत्पन्न बाजार समितीत 110 वृक्षांचं रोपण

42 एकरांच्या मुख्य आवारात वृक्षांचं रोपण

0

वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीत 110 वृक्षांचं रोपण करण्यात आलं. समितीच्या प्रांगणात हे वृक्षारोपण करण्यात आलं. शासनानं चालू वर्षांत दिलेलं वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट पूर्ण करण्यात आलं आहे. निसर्गाशी बांधीलकी जपत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 42 एकरांच्या मुख्य आवारात वृक्षांचं रोपण करण्यात आलंय.

कडूनिंब, पिंपळ, वड, करंजी, रेनट्री, बकुळ इत्यादी वृक्षांचं यावेळी रोपण करण्यात आलंय. तर येत्या काही दिवसातच उर्वरीत रोपट्यांचं रोपण करून उद्दीष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, उपसभापती पवन एकरे, संचालक प्रमोद मिलमिले, सतिश बडघरे, नागेष काकडे, सुनिल वरारकर, महेश देठे, तेजराज बोढे, सहायक निबंधक बि.जी जाधव, सचिव अशोक झाडे, लेखापाल पवन सोनटक्के तसंच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.