मुकुटबन येथे मोबाइल लोकन्यायालय
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे मोबाइल (फिरते) लोकन्यायालयाचे आयोजन बाजार समितीच्या हॉलमध्ये करण्यात आले होते. तालुक्यात १०६ गावे असून प्रत्येक गावातील गोरगरीब जनता वेळेवर झरी येथील न्यायालयात पोहोचू शकत नाही. यामुळे गोरगरीब आदिवासी जनतेसह सामान्य व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागते. जनतेला त्रास होऊ नये व आपल्या केसचा निकाल आपल्याच गावी लागावा, या उद्देशाने फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
मुकुटबन येथे ११ वाजता सुरू झालेल्या लोकन्यायालयात मोटार व्हेयीकलच्या ९ केसेस चा निपटारा झाला. यात ९ हजार ४०० रुपये शासन तिजोरीत जमा झाले. लोकन्यायालयचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. जी. बोधनकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणेदार धनंजय जगदाळे, ॲड. डी. व्ही. काटकर, ॲड. एन. सी. तीर्थगिरीकर, एम. डी. भेंडोडकर, वि. नी. तुलशिवार, कमलेश दोहतरे, डी. एन. धोंडगे, राहुल बोथले आदींचा समावेश होता. यशस्वीतेसाठी नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे, प्रवीण ताडकोकुलवर, रमेश ताजणे यांनी परिश्रम घेतले..