इनोव्हाने उडवले दोघांना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

वणीत बसस्थानकाजवळ दुपारी घडला थरार

0

विवेक तोटेवार, वणी: वणीत बसस्थानकाजवआज दुपारी अपघात झाल्याची घटना घडली. ज्यामध्ये 68 वर्षीय वृद्धांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक इसम जखमी झाला आहेे.

Podar School 2025

गुरुवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सूरज जांभुळकर राहणार राजूर हा तरुण पॅशन प्रो (एम एच 29 ए पी 8464) या गाडीने वणीतील बसस्थानकाजवळून जात होता. त्यास वेळेस दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बाईकने सूरजच्याा बाईकलाा धडक दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघात झालाा त्यावेळी यवतमाळच्या दिशेने इनोव्हा (एम एच 34 ,4656) ही गाडी जात होती. त्याच वेळी अपघात झाला होता. मध्ये बाईक आल्याने इनोव्हा चालकाने बाईकस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इनोव्हानेे सूरजला चिरडले.

धडक बसल्यावर इनोव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ईनोव्हाने रस्त्याने जाणारे वृद्ध विठ्ठल लिगन्ना असपवार राहणार नाकोडा जिल्हा चंद्रपूर यांना धडक दिली. यात विठ्ठल यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या तरुणाला आधी वणीतील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र प्रकृती अवस्थाने युवकाला सध्या चंद्रपूरला हलवण्यात आले.

गाडीचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.