न्याय हक्कासाठी संघटीत होणे काळाची गरज: राजेंद्र मरसकोल्हे
वणीत आदिवासी संघटनाद्वारे विदर्भस्तरीय चर्चासत्र
विवेक तोटेवार, वणी: जागतिक आदिवासी दिनानिमित्त विदर्भ प्रदेश आदिवासी सामाजिक संघटना वणी द्वारा विदर्भस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. शनिवार दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी बाजोरिया हॉल वणी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ‘ऑर्गनाझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल’चे राजेंद्र मरसकोल्हे हे होते. या वेळी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
या प्रसंगी राजेंद्र मरसकोल्हे म्हणाले की आदिवासी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र यावे. अशा चर्चासत्रामुळे आदिवासी समाजात शैक्षणिक व सामाजिक जागृती निर्माण होण्यास मदत होईल अशी सार्थ अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या समाजाभिमुख कार्याला उजाळा देण्यात आला.
चर्चासत्राचे उदघाटक म्हणून जेष्ठ सामजिक कार्यकर्ते वामनराव सिडाम (पांढरकवडा) उपस्थित होते. या प्रसंगी विचारपीठावर संघटनेचे अध्यक्ष रामदासजी गेडाम, कार्याध्यक्ष उत्तमराव गेडाम, प्रा. वसंत कणाके, एम के कोडपे, सौ मनिषा तिरनकर यवतमाळ , प्रा. गणेश माघाडे, विजय कुमरे (चंद्रपूर), फकिरा जुमनाके( पुसद), सामाजिक कार्यकर्त्या सौ पुष्पाताई आत्राम, गितघोष, शंकर मडावी उपस्थित होते.
आदिवासी समाजातील केवळ आठ टक्के विद्यार्थी इयत्ता 10 वि पर्यंत पोहचतात याबद्दल वसंत कणाके यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. यावेळी समाजातील सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक तुळशीराम पेंदोर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष आडे, वसंत चांदेकर, पैकू आत्राम यांचा शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. इयत्ता 10 वित उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या कु. श्वेतली अनिल सलूरकर व संदीप गणेश नैताम यांचे रोख रक्कम व भेट वस्तू देऊन कौतुक कऱण्यात आले.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक उत्तमराव गेडाम यांनी तर सूत्रसंचालन सुभाष आडे व अजय राजगडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार भावराव आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर आत्राम, अशोक राजगडकर, गिरीधर नारनकर, नीलकंठ परचाके, अशोक तिरनकर ,मंदाताई आत्राम तथा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.