बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब
झरी युवक काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत. या प्रकारावर काँग्रेस आक्रमक झाली असून याविषयावर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे खाते बोरी येथील स्टेट बँकेत असून कर्जकरिता नवीन केस तयार करून कर्ज उचलण्याच्या बेतात शेतकरी बँकेत गेले असता २ महिन्याचा कालावधी लागतो अशी बतावणी केली जात आहे. परंतु तालुक्यातील काही शेतकर्यांनी १ महिन्यापासून अर्ज करूनही नवीन कर्ज मिळत नाही.
ज्या शेतकर्याना कर्जमाफी झाली त्या शेतकर्याना ३ महिने लागत आहे. तरी तालुक्यातील टाकळी, अहेरअली, दाभा, पिवरडोल सतपेल्ली, डेमाडदेवी, गवारा, मांडवी, तसेच शिवारातील लोकांना न्याय देऊन त्वरित पीककर्ज उपलब्ध करून द्यावे अन्यथा युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
यावेळी संदीप बुरेवार, निलेश येलटीवार, हरिदास गुर्जलवार, संतोष नेमुलवार, अंकुश गेडाम, प्रवीण तुमराम, राहुल दांडेकर, संतोष कोहळे, रमेश उरवते, राजू उपरे उपस्थित होते.