सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका इसमाने साळीवर बलात्कार केल्याची घटना घडली. तर कोसारा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्याने झरी तालुका हादरून गेला आहे.
मुकुटबन येथील एका महिलेला दोन मुली असुन दोन्ही मुलीचे लग्न झाले आहे. परंतु लहान मुलगी एक वर्षांपासून आपल्या आई जवळ राहत होती. रक्षाबंधना करिता मोठी मुलगी व जावई (26) राहणार सावरहेटी जिल्हा आर्वी हे घरी आले. ९ सप्टेंबर रोज रात्री २ वाजता साळी लघवी करिता घराबाहेर जाऊन परत येत असताना मुलीच्या भाऊजीने तिचा हात पकडून पत्नी झोपून असलेल्या खोलीत नेऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने हादरून मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु वासनेत धुंद
असलेला जावई याने दोघींनाही हातात पावशी घेऊन जिवे मारण्याची धमकी देत मोठ्या बहिणीसमोर साळीवर अत्याचार केला.
घडलेली घटना पहाटे आई व भावाला दोन्ही बहिणीने सांगितली. सकाळी जावई प्रातःविधीसाठी गेल्याची संधी बघून आई व दोन्ही मुलीने पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली. यातक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सदर जावया बाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
कोसा-यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दुसरी घटना कोसारा येथील आहे. गावातच १७ वर्षीय तरुणी आपल्या आई व भावासोबत राहते. मोलमजुरी करून ते आपलं कुटुंब चालवतात. भाऊ गावतीलच एका शेतक-याच्या शेतात काम करतो. पीडित मुलीच्या आईचे गर्भपिशवीचे शस्त्रक्रिया झाल्याने ती सेवाग्राम येथे १ महिना भरती होती. त्या दरम्यान गावतीलच मधुकर आत्राम नामक व्यक्तीने घरात येऊन तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणालाही याबाबत सांगशील तर जिवाने ठार मारिन अशी धमकी दिली.
भीतीमुळे मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे मधुकरची हिम्मत वाढून त्याने मुलीवर तीन-चार वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ६ सप्टेंबर ला पीडित मुलगी आपल्या भावाचा डबा सकाळी १० वाजता शेतात देऊन येत असताना गावाजवळील एका जनावरांच्या गोठ्याजवळ अडवून जबरदस्तीने गोठ्यात नेऊन पुन्हा अत्याचार केला व धमकी दिली.
पीडित मुलगी रडत गोठ्याबाहेर निघाली असता जवळूनच जात असलेल्या गावातील महिलांनी मुलीला विचारले असता घडलेली हकीकत सांगितली. यावरून घरच्या सदस्यांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरूनही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार धंनजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार व शशिकांत नागरगोजे करीत आहे.