वणी शहर भयमुक्त करण्यासाठी कटिबद्ध: ठा. खाडे
सण उत्सव सर्वधर्म समभाव भावनेने साजरे करण्याचं आवाहन
सुरेंद्र इखारे, वणी: वणी पोलीस स्टेशन व शांतता कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनिग सभागृहात दिनांक 10 सप्टें सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या सभेत येणा-या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला तसेच यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक एम राजकुमार हे होते तर प्रमुख अतिथी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, एसडीओ प्रकाश राऊत, एसडीपीओ विजय लगारे मुख्याधिकारी संदीप बोरकर तसेच शांतता कमिटीचे डॉ. महेंद्र लोढा आणि राजाभाऊ पाथ्रटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना बाळासाहेब खाडे म्हणाले की वणी शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी मी कटिबद्ध असून कर्तव्यनिष्ठेने व जबाबदारीने मी कर्तव्य पार पाडत आहे. संपूर्ण वणी शहरातील माताभगिनींना वणी भयमुक्त करून दाखवीन यासाठी मी कटिबद्ध राहील असेही ते म्हणाले.
यावेळी गणपतीची परवानगी ऑन लाईन मिळेल. मूर्तीची स्थापना रोडवर करू नये. दहा दिवस मूर्तीची काळजी घ्यावी. देखावे करत असताना कायदेशीर इलेक्ट्रिक सप्लायघ्या कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. दोन दिवस विसर्जन चालणार आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये.
गणेश उत्सव दुर्गा उसत्व मोहरम यासारखे उसत्व सर्वधर्म समभावाने साजरे करण्यात यावे. ध्वनी प्रदूषणाबद्दल कायद पाळणे गरजेचे असून 50 ते 55 डेसिबल च्यावर याचा आवाज जाता कामा नये. अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शांतता कमिटीचे सदस्य डॉ. महेंद्र लोढा, राजाभाऊ पाथ्रटकर, राजू उंबरकर, मंगल तेलंग, रजा क पठाण, शालिनीताई रासेकर, राकेश खुराणा रवी बेलूरकर, नारायण गोडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ आवारी, बीडीओ राजेश गायणार, ठाणेदार बाळासाहेब खाडे, संग्राम ताठे, वाकडे इत्यादी अधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन रवी साल्फेकर यांनी केले तर आभार वाकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शेखर वानधरे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे पोलीस विभाग व शांतता कमिटी ने परिश्रम घेतले.