सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तान्हा पोळा साजरा करण्यात आला. यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ज्या प्रकारे शेतकरी बैलाला पोळ्याच्या दिवसाला सजावट करतो त्याप्रकारे लहान मूल सुद्धा आपल्या नंदीची सजावट करतो. या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश पाचभाई (अध्यक्ष, रक्तदान महादान फाऊंडेशन) यांनी केले.
या कार्यक्रमात चिमुकल्यांसाठी नंदी सजावट स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक यश लालसरे, द्वतिय पारितोषिक कुशन कोठारी, तृतीय पारितोषिक चैताली आसुटकर, चौथे पारितोषिक लक्की घाटे या चिमुकल्यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लताताई आत्राम (सभापती झरी जामनी) उद्घाटक अरुण हिवरकर (सरपंच), प्रमुख पाहुणे देवतळे, डॉ.मासिरकर, अशोक उरकुडे, भास्कर सूर, तर राजू करमनकर, मार्कंडी पारखी, वाघुजी उरकुडे, चौधरी, संतोष पारखी, चंद्रकांत पानघाटे, नरेंद्र कोठारी, निर्मला दातारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या आयोजनात तान्हा पोळा समितीचे अध्यक्ष राहुल ठाकूर, उपाध्यक्ष दिगंबर पाचभाई, सचिव गणेश पेटकर व आदी सदस्यांसह रक्तदान फाउंडेशन व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.