विवेक तोटेवार, वणी: शहरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेले जोबनपुत्रा यांच्या दुकानात गुरुवारी 20 सप्टेंबर रोजी रात्री चोरी झाल्याची घटना आहे. महत्वाचे म्हणजे गुरुवारी 13 सप्टेंबर या तारखेला हेच दुकान फोडून चोरट्यानी जवळपास 9 लाख रुपयाचे मोबाईल लंपास केले होते.
मागील आठवढ्यात याच दुकानात दुकानाच्या वरचे टिन वाकवून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. व 9 लाख रुपये किंमतीचे मोबाईलची चोरी केली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा याच दुकानाचे समोरून 5 कुलूप फोडून जवळपास 5 ते 7 लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यानी लंपास केले आहे.
गुरुवारी रात्री नेहमूप्रमाणे दुकान बंद करून गौरव जोबानपुत्रा घरी गेले. शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांना त्यांच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या एका व्यावसायिकानी फोन करून माहिती दिली. की त्यांच्या दुकानाचे कुलूप तुटून पडलेले आहे. व दुकानात चोरी झाल्याची शंका बोलून दाखविली. गौरव यांनी क्षणाचाही विलंब न करता दुकान गाठले. दुकानात येऊन बघितले असता दुकानाचे 5 कुलूप तुटून पडले होते. आत जाऊन बघितले असता दिसून आले की, दुकानंतले जवळपास 5 ते 7 लाख रुपयांचे नव्याने खरेदी केलेले मोबाईल चोरी गेले आहे. तसेच दुकानाचे सामान अस्ताव्यस्त केले आहे. गौरव यांनी त्वरित पोलिसांनी फोन करून चोरीची माहिती दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली.
एकाच आठवढ्यात दुसऱ्यांदा एकाच दुकानात चोरी झाल्याने व्यावसायिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण वणीतील अतिशय रहदारी असलेल्या चौकातील दुकानात चोरी होऊ शकते तर इतरही दुकानात चोरी करणे सहज शक्य झाले आहे.
वणी तालुक्यात चोरीच्या या पंधरा दिवसात 5 ते 6 घटना झाल्या परंतु यापैकी एकही चोरट्यास जेरेबंद करण्यात पोलिसांना अध्यापही यश मिळाले नाही. मोठमोठया गुन्हेगारांना त्वरित गजाआड करणाऱ्या वणी पोलिसांची धार या चोरट्यांपुढे बोथट झाल्याचे दिसत असल्याची चर्चा वणीकर जनतेत सुरू आहे.
सुरवातीला चोरी केलेल्या मोबाईलचे खाली केलेले डब्बे दुकानाच्या जवळच सापडले. त्याबाबत तक्रारकर्त्याने पोलिसांना माहिती दिली. परंतु पोलिसांनी या घटनेचा पंचनामा अध्यापही केला नसल्याची माहिती आहे. यापुढे पोलीस काय आता कोणते पाऊल उचलते याकडे सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
काही व्यापाऱ्यांकडून ही महिती मिळाली की, वणीमध्ये काही स्त्रिया कडेवर लहान मुलांना घेऊन चोरीच्या मोबाईलची विक्री करीत आहेत. असे चोरीचे मोबाईल या स्त्रिया अगदी कमी किंमतीत विकत आहेत. अशा लोकांना पकडल्यास पोलिसांना चोरट्यांबाबत माहिती मिळू शकते.