सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चालबर्डी येथील शेतकरी उत्तम जयराम पंधरे व दिवाकर सोनेराव पुसाम या शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या चार महिन्यांपासून तार पडलेली आहे. शेतकऱ्यांना शेतीकरिता पाण्याची अत्यंत आवश्यक आहे. मात्र तार जोडून वीज पुरवठा सुरू करून देण्याऐवजी वरिष्टसह तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी दोन दिवसात तार जोडतो कधी आठ दिवस तर कधी एक महिन्यात करू तर तुमच्या कामाला वेळ लागेल असे सांगून चालढतल करूत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान होत आहे.
शेतीच्या भरवश्यावर दोन्ही शेतकऱ्यांचे उपजीविका आहे. त्यामुळे दोन दिवसात तार जोडून लाईन सुरू न केल्यास झरी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची तक्रार वीज कंपनीसह वरिष्ट अधिकऱ्याकडे वरील दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.