मार्की (बु) येथील लाखो रुपयांचा आरो फिल्टर मशीन धूळखात

शुद्ध पाण्यापासून ग्रामवासी वंचित, ग्रामवासियात संताप

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्किं (बु ) ग्रामपंचायतमध्ये  ग्रामवसीयांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता लाखो रुपये खर्च करून आरो फिल्टर मशीन लावण्यात आली. परन्तु अनेक दिवसांपासून हा फिल्टर आरो मशीन धूळखात आहे. ज्यामुळे जनता त्रस्त झाली असून सरपंच व सचिवविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. तसेच  ग्रामपंचायत करिता शासनाचे अनुदान येऊन सुद्धा सरपंच आणि ग्रामसेवकांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

गावातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला असून आरो प्लांट त्वरित सुरू करण्याची मागणी गावकर्यांकडून होत आहे. मार्कि ग्रामपंचायत मध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याने गावातील विकास खुंटला असून आरो मशीन सुद्धा धूळखात असल्याची माहिती आहे.

ग्रामपंचायतच्या अंतर्गत वादामुळे अंगणवाडी बिल्डींग मध्ये बसविण्यात आलेले फिल्टर आरो प्लांटची कोणत्याच अधिकार्यांनी पाहणी केली नाही. विशेष म्हणजे ग्रामसभेच्या वेळेस सरपंच व सचिव हजर नसतात ज्यामुळे गावातील समसेचा पाढा कुणासमोर वाचावे असाही प्रश्न ग्रामवासियानी केला आहे. गावातील आरो फिल्टर प्लांट त्वरित सुरू करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.