आजपासून जेसीआयच्या ‘रास दांडिया 2018’ ला सुरुवात
नामवंत सेलिब्रिटीची हजेरी, बक्षिसांची लूट
बहुगुणी डेस्क, वणी: नवरात्रोत्सव म्हणजे गरबा… दांडिया खेळण्याचा जणू हा उत्सवच… वणीकरांमध्ये याबाबतची जी उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. जेसीआयतर्फे आयोजित ‘रास दांडिया 2018’ या कार्यक्रमाला बुधवार दिनांक 10 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. 9 दिवस चालणारा हा दांडिया वणीतील बस स्टॉप मागील नगरवाला जिनिंग क्रमांक 1 च्या मैदानात संध्याकाळपासून रंगणार आहे. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी या दांडियाचं आकर्षण आहे. तसेच दर दिवशी स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षीस देखील ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट मॅनेजर जेसी जयेश चोरडिया आणि जेसी जितू पाटील आहे. पहिल्यांदाच ‘वणी बहुगुणी’ या इव्हेंटमध्ये मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होत आहे.
दांडियाची पूर्वतयारी म्हणून स्थानिक एसबी लॉनमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सुमारे 700 महिला सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या चार दिवसांमध्ये सुप्रसिद्ध कोरिओग्राफर मास्टर मयूर, हैदराबाद यांच्या मार्गदर्शनात शिबिरार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. हे सर्व शिबिरार्थी या दांडियात सहभागी होणार आहे.
कार्यक्रमात हजेरी लावणार एकसे बढकर एक सेलिब्रिटी
या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे फॅशन, गायन, अभिनय, बॉलिवूड इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटीची हजेरी आहे.. इंडियन आयडलची फायनलिस्ट दीक्ष फॅशन मेंटर निखिल आसवानी, मिस महाराष्ट्र सानिका सोवानी, मिसेस इंडिया एकता भाईया, मिसेस गुजरात भूमिका वाखरिया तसेच मस्त विदर्भ म्हणून ओळख असलेली चिमुकली झिशान ही देखील सहभागी होणार आहे. तर शेवटच्या दिवशी लाईव्ह बँडच्या तालावर दांडिया होणार आहे.
संपूर्ण 9 दिवसांच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी केवळ 100 रुपये ही सहयोग शुल्क ठेवण्यात आली आहे. तर कपल साठी 200 रुपये तर कुटुंबाच्या पाससाठी पाचशे रुपये ठेवण्यात आले आहेत. यात पाच मेंबर्सना सहभागी होता होणार आहे. कार्यक्रमाचे पास प्रज्योत ज्वेलर्स, वणी व सहेली फॅशन, वणी येथे उपलब्ध असणार आहे. कार्यक्रमदरम्यान सर्व काळजी घेण्यात आली असून मुलांसाठी कीड झोन आणि खवय्यांसाठी फूड स्टॉलदेखील असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेची काळजी म्हणून सोबत महिला सदस्य असल्याशिवाय कोणत्याही पुरुषांना प्रवेश मिळणार नाही.
सहभागी सदस्यांसाठी बक्षिसांची लूट
दांडिया कार्यक्रमात सहभागी होणा-या सर्व सदस्यांसाठी बक्षिसांची मोठी लूट करण्यात आली आहे. यात रोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यात दररोज 41 पेक्षा अधिक गिफ्ट आणि 15 बम्पर गिफ्ट दिले जाणार आहे. यात रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, कॉम्प्युटर, ओव्हन, होम थिएटर, सायकल, मोबाईल, केंट आरो, मिक्सी, प्रेस इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
वणी बहुगुणीशी बोलताना प्रोजेक्ट मॅनेजर जेसी जयेश चोरडिया आणि जेसी जितू पाटील म्हणाले की…
दांडिया संपूर्ण तयारीने झाला तरच त्यात खरी गंर मत आहे. त्यामुळे आम्ही हैदराबादवरून खास कोरिओग्राफर आणून सुमारे 700 महिलांना दांडियाचे प्रशिक्षण दिले. यासोबतच ड्रेस सेंस, मेकअप याविषयीही त्यांना प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. ग्राउंड, लायटिंग, डेकोरेशन इत्यादी संपूर्ण गोष्टीची तयारी झाली आहे. महिलांच्या सुरक्षेची खास काळजी घेण्यात आली असून यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आली आहे. तसेच बाउंसर आणि सुरक्षा रक्षक ही कार्यक्रमात सुरक्षेसाठी असणार आहेत. आता संपूर्ण तयारी झाली असून आम्ही वणीकरांची या कार्यक्रमासाठी वाट बघतोय.
लिंकवर क्लिक करून पाहा शिबिरार्थ्यांच्या तयारीचा व्हिडीओ…