नवरात्री उत्सवानिमित्य भाविकांना मोफत ऑटो सेवा
सकाळ ते रात्री पर्यंत वॅन आणि ऑटोने प्रवासी सेवा
विवेक तोटेवार, वणी: नवरात्र या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने मंदिरात जातात. पण प्रत्येकांकडे वाहनाची सोय नसते. तर अनेक वृद्धांना मंदिरात जाणे शक्य कठिण होते. भाविकांना सणोत्सवाच्या काळात त्रास होऊ नये यासाठी वणीतील संकल्प मित्र मंडळ आणि क्रांती युवा संघटने तर्फे मोफत प्रवास सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे शनिवारी दिनांक 13 ला उद्घाटन करण्यात आले. गाडगेबाबा चौकातून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. राकेश खुराणा, ओम ठाकूर, बाबूलाल पोटदुखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ही सेवा मंदिरात जाणा-या सर्व भाविकांसाठी आहे. 7 वाजेपासून सुरू होणारी ही सेवा रात्री पर्यंत सुरू राहणार आहे. जैताई मंदिर आणि साई मंदिर इथे दर्शनाकरिता जाणाऱ्या भाविकांना मंदिरात ऑटो आणि वॅनद्वारे नेले जाणार आहे. या सेवेचे वणीकर कौतुक करीत आहे. संकल्प मित्र मंडळ ही संघटना गेल्या 15 वर्षांपासून दरवर्षी नवरात्रीमध्ये मंदिरात जाण्यासाठी भाविकांना मोफत ऑटोची व्यवस्था करते. यावर्षी त्यांना युवा क्रांती संघटनेने साथ दिली आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजू गव्हाणे, लोकेश गुंडलवार, सूरज चाटे, विजू गव्हाणे, जमीर भाई, योगेश सोनवणे, सतीश गेडाम, पियुष शतपालकर, मारोती खडतकर, कपिल जुनेजा, संकेत उलमाले, आकाश नागतुरे, आकाश ढवळे, प्रीतम ऍडलावार आदी क्रांती युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.