रामदेवबाबा अपंग मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपण व फळ वाटप
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाचा वाढदिवस साजरा
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील राजूर विकास संघर्ष समितीचे कार्यकर्ता तसेच मॅकरून शाळेचे शिक्षक अजय कंडेवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. यावेळी तिथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले.
अजय कंडेवार हे प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेऊन आज शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गरीबांना शिक्षणासाठी काय कसरत करावी लागते याची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे ते वणी आणि गावात अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांची मोफत शिकवणी घेतात. यासोबत ते विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात.
याचाच एक भाग म्हणून त्यांनी त्यांचा वाढदिवस चिखलगाव येथील रामदेवबाबा अपंग मूकबधिर निवासी विद्यालयात जाऊन साजरा केला. येथील विद्यार्थ्यांना फळ देऊन व त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापला. त्यानंतर तिथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आाला.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य जिनेंद्र भंडारी, सौ. भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला कुमार मोहरमपुरी, डेविड पेरकावार, प्रवीण खानझोडे, जयंत कोयरे, अनिल डवरे, महेश लिपटे, निलेश बुरबुरे, मित्र परिवार उपस्थित होता.