सुरदापूर येथील भवानी मंदिर मार्गावर स्ट्रीट लाईटची सुविधा

आमदार निधीतून करण्यात आले कार्य

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील सुरदापुर येथे सुप्रसिद्ध भवानी मंदिर आहे. या मंदिरात तालुक्यासह तेलंगणातूनही भाविक मोठ्या संख्येने नवरात्र उसत्वाकरिता व इतरही दिवशी दर्शनाकरिता येतात. नवरात्र उत्सवात इथे भाविकांची मोठी रेलचेल असते. मात्र मंदिराच्या मुख्य मार्गावर लाईटची व्यवस्था नसल्याने भाविकांना अंधारातूनच वाट काढावी लागायची.

सुरदापूरची ही समस्या कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी या कार्यासाठी पुढाकार घेतला. नवरात्र उत्सवात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आमदार निधीतून स्ट्रीट लाईट बसवून दिले. याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

या कार्यक्रमास आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, लता आत्राम (सभापती प. स. झरी), संगीता सुरेश मानकर (जि. प. सदस्य), मिनाक्षी बोलेनवार (जि.प.सदस्य), राजू गोंड्रावार (पं. स. सदस्य), अशोकरेड्डी बोदकुरवार, सुरेश मानकर, मुन्ना बोलेनवार, भाजप तालुक अध्यक्ष अनिल पोटे, माजी सभापती कॉटन मार्केट अनिल पावडे, राम आईटवार, धर्माजी आत्राम, भाऊराव मेश्राम, सतीश नाकले, सतीश दासरवार, प्रविण नोमुलवार, मोहन चुक्कलवार यांची उपस्थिती होती.

याच्यासह सरपंच पुष्पा संसनवर, उपसरपंच रुक्सना गुलाम, ग्रामपंचायत सदस्य राजरेड्डी गुम्मडवार, कविता उईके, अशांना इरगोलवार ग्रामवासी नरेंद्र गुर्लावार, मुरलीधर वैद्य, संजय मोठ्यमवार, जिवनरेड्डी सामावार, उमेश येल्टीवार, संजय संकसनवार, रवींद्र बद्दमवार, राजेश गुंडावार, संजय बोदकूरवार तसेच सुरदापूरचे समस्त ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.