विवेक तोटेवार, वणी: नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव. नवरात्रीत या आदिशक्तीचा सन्मान अनोख्या पद्धतीने करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून नवरात्रीत गरजू महिलांना नवीन साडी परिधान करण्यास मिळावी या उद्धेशाने मंदिरासमोरील निराधार महिलांना साडी वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी दुपारी जैताई मंदिर समोर हा कार्यक्रम झाला.
बुधवारी शिवसेनेचे जैन लेआऊट शाखाप्रमुख सुभाष सातपुते यांच्या पत्नी सविता यांचा वाढदिवस होता. वाढदिवस आणि नवरात्रीचे औचित्य साधून त्यांनी यावर्षी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवले. स्थानिक श्री जैताई देवस्थानात गरजू, विधवा, निराधार महिला येतात. त्या महिलांना नवरात्रीत नवीन कपडे मिळावे या उद्देशाने त्यांनी तिथं असलेल्या महिलांना साड्यांचे वाटप केले.
नवरात्रीनिमित्त नऊ महिलांना यावेळी साडीचोळी भेट देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर, उपशहर प्रमुख प्रशांत बलकी, महेश चौधरी, विभागप्रमुख मंगल भोंगळे, राजू देवडे, अजिंक्य शेंडे, संतोष ढुमणे, कवी सुनील
इंदुवामन ठाकरे, सम्यक बनसोडकर, ढाले, सुप्रिया सातपुते, बलकी, बांगडे, बोंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणीतील शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते नेहमीच सामाजिक उपक्रम राबवतात. दरवर्षी अनेक शिवसैनिक त्यांचा वाढदिवस निराधार, अनाथ बालकांसोबत, वृद्धांसोबत साजरा करतात.