राजूर येथे शीतशवपेटीचे लोकार्पण

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शवपेटी दान

0

राजुर कॉलरी: राजुर कॉलरी येथे ६२ व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’चे औचित्य साधून स्थानिक वानखेडे परिवाराकडून दीक्षाभूमी बुद्ध विहारास शीतशवपेटीचे दान करण्यात आले. ही शीतशवपेटी असल्याने मृतदेह जास्त काळ ठेवण्याची सोय झाली आहे. केवळ नाममात्र शुल्क आकारून ही शीतशवपेटी उपलब्ध करू दिली जाणार आहे.

दरवर्षी प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमी बुद्धविहार येथून मिरवणूक काढण्यात आली. रॅलीचा समोरोप झाल्यानंतर दीक्षाभूमीच्या मैदानावर विविध कार्यक्रम घेण्यात आले. राजूरमध्ये दरवर्षी अनेक जण आपल्या पारंपरिक रितिरिवाजाला फाटा देऊन बुद्धविहाराला काहीतरी भेट देत असतात.

या वर्षी राजूरमधले प्रसिद्ध व्यवसायी अशोक वानखेडे व त्यांच्या कुटुंबांकडून त्यांच्या मातोश्री स्मृतिशेष अंजनाबाई सुखदेव वानखेडे यांचे स्मृती प्रित्यर्थ “शीतशवपेटी” बुद्धविहारास दान करण्यात आली. राजूर हे गाव वणी तालुक्यात मोठे असले तरी गावात शीतशवपेटी नव्हती. त्यामुळे बाहेरगावाहून शीतपेटी मागवावी लागयची. तर अनेकदा ही पेटी उपलब्धही नसायची. ही बाब लक्षात घेऊन वानखेडे यांनी शवपेटी दान कऱण्याचा निर्णय घेतला.

दीक्षाभूमी मैदानावरील झालेल्या कार्यक्रमात हि शीतशवपेटीचे त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या वेळेस दीक्षाभूमी बुद्ध विहार कमिटीचे सभासद व गावकरी उपास्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.