वणीत आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोग निदान व उपचार शिबिर
शनिवारी सकाळी 9-12 दरम्यान वणीतील ग्रामीण रुग्णालयात आयोजन
विवेक तोटेवार, वणी: वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 27 ऑक्टोबरला मोफत आयुर्वेद आणि होमिओपॅथी निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत हे रोग निदान आणि उपचार शिबिर चालणार आहे. राष्ट्रीय ग्रामीणम आरोग्य अभियान आयुष विभागा अंतर्गत हे शिबिर घेण्यात येत आहे.
या शिबिरात मधूमेह या रोगावर आयुर्वेदीक उपचार तर मूत्रविकार यावर होमिओपॅथी उपचार केले जाणार आहे. मधूमेह या रोगावर तपासणी डॉ. विवेक गोफणे करणार आहे. डॉ अरूण विधाते हे मूत्रविकाराच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या शिबिराचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भालचंद्र आवारी, जिल्हा आयुष विभाग अधिकारी राजेश साहू हे मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर मोफत असून याचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक, कर्मचारी यांनी केले आहे.