जुणोनी येथे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेत्र तपासणी शिबिर
सुशील ओझा, झरी: हा तालुका आदिवासी बहुल तालुका असून गोरगरीब आदिवासी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जुणोनी येथे आमदार बच्चू कडू अभियानांतर्गत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले .महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर व विलास पवार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विलास पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे माजी नगरसेवक टोनू मेश्राम, ब्रायण ठेगरे होते.
कार्यक्रमाचे आयोजन आसिफ कुरेशी प्रहार तालुका प्रमुख यांनी केले. नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तालुक्यातील ७७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली व माफक दरामध्ये ३६५ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. शिबिरात १४२ रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले असून रुग्णाच्या जेवण व राहण्याची सुविधा करण्यात आली आहे .
तालुक्यात जिल्हा प्रमुख विलास पवार यांनी अनेक शिबिर घेतले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता प्रहार संघटनेचे शाखा प्रमुख विक्रम संभे, रणधीर जुमनाके, नेमीचंद टेकाम, बंटी कुचनकार, अतुल वेट्टी, विपुल राऊत, विनोद जुमनाके अमोल येरगुडे, नीतेश अस्वले, कैलास मडावी, भाविक सोयाम, नीतेश तुमराम, अमोल अलचटतीवार, पावन दुर्गे, मोहन अरके, निखील पंधरे, संजय कोडापे, प्रशांत मुसळे, सागर मच्चवार, विलास येरावर, मारोतो गौतरे व तालुक्यातील शेकडो प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.