…अन चिमुकलें लेकरं पाणावलेल्या डोळ्यांनी बघतात आईची वाट

कढोली येथील महिला एक महिन्यापासून बेपत्ता

0

विलास ताजने, मेंढोली: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खु.) येथील विवाहित महिला एक महिन्यापासून बेपत्ता आहे. कुटूंबीय शोध घेत आहे. परंतु अजून काही सुगावा लागला नाही. परिणामी कुटुंबातील लोकांची चिंता वाढली आहे. आज नाही तर उद्याला आई येईलच या आशेने चिमुकलें लेकरं पाणावलेल्या डोळ्यांनी आईची वाट बघत आहे.

सुनीता ज्ञानेश्वर ताजने वय ३४ असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. सुनीता ही १५ ऑक्टोबरला घरच्यांना काहीही न सांगता घरून निघून गेली. सुनीताचे पती ज्ञानेश्वर हे शिंदोला लगतच्या शालिवाहन पॉवर प्लांट चनाखा येथे जेसिबी चालक आहे. या दाम्पत्यांना एक मुलगा व मुलगी आहे. घटनेच्या दिवशी ज्ञानेश्वर शिदोरी घेऊन कामावर गेले होते. तर मुले शाळेत गेली होती.

ज्ञानेश्वर घरी आल्यावर पत्नी दिसत नाही म्हणून शेजारी चौकशी केली. तेंव्हा सुनीता दुपारच्या वेळी कढोली – राजुरा बस मध्ये बसून गेल्याचे काही महिलांकडून समजले. या अगोदर देखील सुनीता चार वेळा माहेरी किंवा नातेवाईकांकडे निघून गेली होती. सुनीता ही साधीभोळी असून थोडी गतिमंद असल्याचे तिच्या पतीने सांगितले. सुनीताच्या माहेरी गोवारी (स्वास्ती) येथे आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र काहीच सुगावा लागला नाही.

अखेरीस सुनीता बेपत्ता असल्याची तक्रार सुनीताचे पती ज्ञानेश्वर यांनी गडचांदूर पोलिसात दिली. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.