मारेगावात ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी
रोशनाई, फटाक्याची आतषबाजी, 40 किलोचा केक ठरला लक्षवेधी
नागेश रायपुरे, मारेगाव :- मारेगाव शहरात ईद मिलादुन्नबी निमित्य यंग मुस्लिम कमेठी व गौसिया मस्जिद कमेठीच्या च्या वतीने महमद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
ईद मिलादुन्नबी निमित्य शहरात आठवड्या पूर्वी पासुन महामार्ग पासून कलाम चौक ते गौसिया मस्जिद परिसरात तोरण पताका झेंडे लावून विविध रोशनाई करण्यात आली.दोन दिवसा पूर्वी मुस्लिम समुदायातील महिला व पुरुष वर्गा करिता प्रवचनपर कार्यक्रम घेण्यात आले.20 नोव्हेंबर ला रात्री दरम्यान येथील कलाम चौकात चाळीस कीलो चा केक ठाणेदार दिलीप वडगावकर नगरसेवक मो.खालीद पटेल यंग कमेठीचे मो.जुबेर पटेल यांच्या हस्ते ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव व शहरातील प्रतिष्टिता समक्ष कापून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
21 नोव्हेंबर ला सकाळी 9 वाजता दरम्यान गौसिया मस्जिद पासून शहरातून मार्गक्रमण करुण जुलुस काढण्यात आला या जुलूस मध्ये ट्रॅक्टरवर असलेले मक्का मदीना चे चित्ररथ,त्यावर तोफ ने होत असलेले फुलांचा वर्षाव व कवालीने अवघ्या शहराचे लक्ष्य वेधले.जुलुस दरम्यान ठिकठिकाणी खिर पुरी, शिरखुरमा,शरबत चे वाटप करण्यात आले.गौसिया मस्जिद चे आलिम कलीमुदीन यांनी मुस्लिम समुदाय तर्फ देशात सुख शांति लाभुन हिंदू मुस्लिम एकात्मतेसाठी नमाज अदा करण्यात आली व सामुहिक भोजन करण्यात करुण यंग मुस्लिम कमेठी व गौसिया कमेठीच्या वतीने शहरात मोठ्या उत्सवात ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात आली.
जुबेर पटेल,जुनेद पटेल,नवाज शरीफ,शाकिर शेख,आसिफ कुरेशी,रोशन शेख,युसूफ कुरेशी,आशिक शेख,नुरखा पठाण,तौफीक अल्ली,अबरार कुरेशी,आरिफ सय्यद आदी यंग कमेठीने परिश्रम घेतले.