महाराजा यशवंतराव होळकर यांची 243 वी जयंती साजरी
सुरेन्द्र इखारे वणी: येथील साई नगरीतील काशीनाथ पचकटे यांच्या घरी धनगर समाज संघर्ष समितीने महाराजा यशवंतराव होळकर यांची 243 वी जयंती साजरी केली. यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंग पंडिले हे होते. प्रमुख अतिथी प्रा. लव्हाळे, विलास शेरकी, रघुनाथ कांडरकर उपस्थित होते. विचार व्यक्त करताना प्रा. लव्हाळे म्हणाले की, भारताच्या स्वतंत्र लढ्यात यशवंतराव होळकरांचे फार मोठे योगदान होते.
समाजातील महिलांनी एकत्र येऊन समाजकारणासोबत राजकारणात येण्यासाठी समाजाला संघटित होण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. विकास चिडे यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच गनिमीकावा वापरुन ब्रिटिशांना कसे जेरीस आणले. तसेच त्यांनी केलेले लोकोपयोगी कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याचा इतिहास समाजापुढे मांडला.
विलास शेरकी, रघुनाथ कांडरकर यांनी यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चिडे यांनी केले .तसेच प्रस्ताविक काशीनाथ पचकटे यांनी केले. आभार गजानन तुरारे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशीष ढवळे, प्रल्हाद चामाटे, डॉ भगत, अभय गवरकर, रमेश बरडे, प्रवीण वैद्य, मधुकर ढोकने, कोरडे, संजय कालर, संजय काळे, लटारी हिवरे, दिलीप ढवळे राजेश लोणारे, सुरेन्द्र इखारे, राजेश ढवळे,यांनी सहकार्य केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.