राजूर कॉ. येथे महामानवास अभिवादन
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी इथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहीद भगतसिंग चौकात घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजूर विकास संघर्ष समितीद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनोगत व्यक्त करताना कुमार मोहरमपुरी म्हणाले की सहा डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन असल्याने काही समाज विघाटक लोक या दिवसाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. काही धर्मांध लोकांकडून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. अशा अनेक मार्गाने देशातील सौहार्द संपविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचे हे मनसुबे उधळून संविधानावर चालणारे राष्ट्र निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व जाती धर्म आणि संघटनांच्या लोकांना एकत्र आणून हा अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केले जाते.
अभिवादन कार्यक्रमात छोटुभैय्या श्रीवास्तव, डेव्हिड पेरकावार, धनराज देवतळे, अनिल डवरे, जयंत कोयरे, महेश लिपटे, सरोज मून यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संवि धान दिले. या संविधानामुळेच देशात स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा भाव निर्माण झाला. भारताचे संविधान या देशातील शेवटच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याची व त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची, शोषणाविरुद्ध आवाज उचलण्याच्या अधिकार देते. बाबासाहेबांचे विचार हे कुण्या जाती-धर्मा विरुद्ध नव्हते तर तर शोषणा, भेदवाव मिटवून समताधिष्टीत राष्ट्र निर्माण करण्यासाठी होते. असे प्रतिपादन यावेळी वक्त्यांनी केले.
या अभिवादन कार्यक्रमाला राजूर कॉलरीतील व्यक्तींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय काटकर, अक्षय गावंडे, कैलास पाईकराव, संजय पिसे, अनिल कोहळे, सिनु दासारी, राजाराम प्रजापती, विजय चांभारे, अमर्त्य मोहरमपुरी, शुभम साहू, नौशाद भाई, साबीर अली, समय्या कोंकटवार, सागर नगराळे, शंकर बोरगलवार, धोबी सेठ, करमरकर, बाभळे, अरुण कुमरे आदींनी परिश्रम घेतले.