अडेगाव येथील गुंडावार डोलोमाईत खाणीत सुरक्षा सप्ताह
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील श्रीमती दिपाली गुंडावार लाईमस्टोन अँड डोलोमाईट खाण अडेगाव कडून १८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत खाण सुरक्षा, पर्यावरण व स्वच्छता सप्ताह पाळण्यात आला. त्यानिमित्त १९ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता अडेगाव च्या खाणी मध्ये आलेल्या पथकातील अधिकाऱ्यानी कंपनीच्या खाणीचे, पर्यावरण व स्वच्छताचे निरीक्षण करून उपस्थित कर्मचाऱ्यांना खाण सुरक्षा बद्दल विचारपुस करून मार्गदर्शन केले.
खाण सुरक्षा सप्ताह अंतर्गत, निरीक्षण पथकातील मुख्य खाण सुरक्षा समिती अधिकारी राजेश सिंग (डीजीएम माईन्स मोईल लिमिटेड, नागपूर), खाण सुरक्षा समिती सदस्य अनील झा (ए पी त्रिवेदी अँड सन्स, बालाघाट मध्य प्रदेश), सदस्य देवेंद्र रंगारी (व्यवस्थापक ईशान मिनरल्स, अडेगाव ) ह्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. २ डिसेंम्बर ते ८ डिसेंम्बर पर्यंत सुरक्षा दिन पाळण्यात आला.
राजेश सिंग, अनील झा, देवेंद्र रंगारी यांनी गुंडावार खाणीचे, पर्यावरण, सुरक्षा व स्वच्छताचे निरीक्षण करून कंपनीचे सर्व कागदपत्रे, रजिस्टर व लेखी अहवालाची तपासणी केली. हे निरीक्षण दुपारी १२ वाजेपर्यंत केले त्यानंतर हे पथक ईशान मिनरल्स खाणीकडे रवाना झाले. ह्या सप्ताह दरम्यान श्रीमती दिपाली गुंडावार लाईमस्टोन अँड डोलोमाईट खाण अडेगाव कडून ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वार्षिक खाण सुरक्षा, पर्यावरण सप्ताह यशस्वी करण्यासाठी अलंकार गुंडावार, अजित विश्वकर्मा व अन्य कर्मचारी सतत प्रयत्नशील होते.