मुकुटबन येथील बस स्टॅड चौकात सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या गावात नर्सरी शाळेपासून महाविद्यालय पर्यंत शाळा महाविद्यालयआहे. अनेक कार्यालय , बँक सोसायटी व इतर कार्यालय असून मोठी बाजारपेठ व बँकेच्या कामाने तालुक्यातील १०६ गावांचा संपर्क जनतेला येतो. याकरिता हजारोंच्या संख्येने जनता बँक व इतर शासकीय व निमशासकीय कामाकरिता मुकुटबन गावात मोठ्या संख्येने येते. परंतु बाहेर गावातून येणाऱ्या तरुण महिलांसह पुरुषांना शौचालय करिता मोठी अडचण भासत होती. याचा सर्व गोष्टीचा विचार ग्रामपंचायतीने विचार करून बस स्टँडच्या अगदी कडेला पुरुष व महिलांकरिता मोठे सुलभ शौचालय १४व्या वित्त आयोगाच्या फंडामधून बांधून जनतेला मोठा दिलासा दिला.
सरपंच शंकर लाकडे यांनी यापूर्वीदेखील गुरांच्या दवाखान्यासमोरील गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडून असलेले सार्वजनिक शौचालय पूर्ण स्वच्छ करून, कलर करून, नळ लावून पाण्याची व्यवस्था करुन दिले. ज्यामुळे गावातील महिलांना आज त्याचा मोठा आधार मिळाला. ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून सर्वात चांगली विकासकामे मुकुटबन ग्रामपंचायतीने केल्याची तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत ओळख निर्माण केली आहे.
बस स्टँड चौकातील शौचालयामुळे पुरुष व महिलांसह बाहेर गावातील प्रवासी जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे गावकऱ्यांपासून इतर जनताही बोलत होती.सदर लोकार्पण सोहळ्याचे उदघाटक गावातील वयोवृद्ध कोंडबाजी पारशिवे तर अध्यक्ष सरपंच शंकर लाकडे होते. तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव कैलास जाधव, सत्यनारायण येनगंटीवार, संदीप विचू, सुरेश ताडुरवार, मो रफिक, अशोक काल्लूरवार, मारोती येमजेलवार, दीपक बरशेट्टीवार, चक्रधर तिर्थगिरीकर, बापूराव जिंनावर, सत्यनारायण येमजेलवार,श्रीहरी बरशेट्टीवार, गजानन अक्केवार, संजय पारशिवे ,श्रीनिवास संदरलावार,राकेश यांची होती. या लोकार्पणाला गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.