विवेक तोटेवार, वणी: माजरी येथे राहणाऱ्या एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर व तिच्या आईवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अत्याचार करणा-या आरोपीनेच मायलेकीद्वारा शेेतक-यांवर खोटी तक्रार दाखल करण्याचा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या समयसूचकतेमुळे आरोपीचे बिंग फुटले व शिकारी स्वत:च शिकार झाला.
सविस्तर वृत्त असे की, मुलीची आई ही उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील रहिवासी आहे. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. 12 वर्षांपूर्वी तिच्यी पतीचा खून झाला. त्यानंतर ती आपल्या मुलीला घेऊन माजरी येथे स्थायीक झाली. तिची एक मुलगी सुरत येथे राहते तर मुलगा मुंबईत राहतो. पीडिता व तिची आई या माजरी येथे राहून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते.
आरोपी भागवत केवट हा माजरी येथील रहिवाशी आहे. हा आधी वेकोलिमध्ये काम करायचा. परंतु नोकरी सुटतात त्याने मासे विकण्याची व्यवसाय सुरू केला. दरम्यान पीडितेच्यी आईची ओळख भागवतसोबत झाली. पीडिताची आई त्याच्यासोबत राहू लागले. सोबत राहता राहता भागवताची नजर मुलीवर गेली त्याने तिचे लैगिंक शोषण सुरू केले. गेल्या चार पाच दिवसांपासून तो त्या पीडितेसोबत विवाह करून देण्याची मागणी करीत होता. जर मुलीसोबत लग्न करून दिले नाही तर दोघींनाही जाळून मारण्याची धमकी त्याने दिली.
पैसे मिळवण्यासाठी रचला वेगळाच प्लान
मुलगी व आई कोणा या गावातील शेतात कापूस वेचण्याचे काम करायचे. दरम्यान भागवतने मुलीसोबत लग्न लावून देण्याची मागणी केल्याने या दोघीही सोडून जाण्याच्या विचारात होत्या. सोडून जाऊ नये यासाठी त्याने पैसै कमवण्याचा प्लान आखला व यात तिच्या आईला सोबत घेतले. यात त्यांनी ज्या शेतात आई व मुलगी काम करण्यास जात होती त्या ठिकाणी या दोघींचाही बलात्कार झाल्याची खोटी तक्रार करायची व नंतर त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे असा हा प्लान होता.
तक्रार देण्यासाठी या तिघांनी वणी पोलीस स्टेशन गाठले. या खोट्या तक्रारीत पाच जणांनी या दोघींवर आळीपाळीने बलात्कार केल्याचे नमूद केले. तात्काळ अजिबात वेळ न दवडता वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे हे डी बी पथकासोबत त्या व्यक्तीचा शोध घेण्यास निघाले. यावेळी उपस्थित असलेल्या पीएसआय विजयमाला रिठ्ठे यांनी काही प्रश्न पीडितेला विचारण्यास सुरवात केली. घटनास्थळाची पाहणी केली. परंतु पोलिसांच्या हे लक्षात आले की, या तीनही व्यक्ती खोट्या बोलत आहेत. पोलिसांनी सत्य जाणून घेण्यासाठी पीडित मुलीला विचारणा करण्यास सुरुवात केली. यावेळी एक धक्कादायक सत्य समोर आले.
असे फुटले आरोपीचे बिंग
पीडितेच्या सांगण्यावरून असे समजले की, यांच्या सोबत आलेला भागवत केवट हा खरा आरोपी आहे. तोच या अल्पवयीन मुलीचा दोन वर्षापासून लैगिंक छळ करीत होता व त्यानेच पोलिसांसोबत खोटे बोलण्याचा व दिशाभूल करण्याचा सल्ला दिला होता. आई व मुलगी सोडून जाऊ नये व त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी असा कटही रचल्याचे समोर आले.
मुलीच्या जबाबावरून भागवत केवट, पीडितेची आई हिच्यावर कलम 182 नुसार पोलिसांनी खोटी माहिती देणे व दिशाभूल करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली. सदर पूर्ण प्रकरण माजरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. यानुसार भागवत केवट वर कलम 376 नुसार व पोस्को कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.