हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाने साजरी

नगर स्वच्छता अभियानसह वृद्ध व रुग्णांना फळ वाटप

जितेंद्र कोठारी,वणी: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रविवार 23 जानेवारी रोजी वणी येथे उत्साहाने साजरी करण्यात आली. साई मंदिर चौकात त्यांच्या स्मारकावर जाऊन मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली म्हणून शिवसेना वणी शहर व नगर सेवा समितीतर्फे पहाटे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर युवासेना उप जिल्हाप्रमुख अजिक्य शेंडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना व बाजीराव महाराज वृद्धाश्रम मध्ये निराधार वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. तर शहर शिवसेनाच्या वतीने गरजूंना ब्लंकेट वाटप करून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अभिवादन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, नगरसेवा समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे, राजेंद्र साखळकर, महेश पहापळे, महेश लिपटे, शंकर टिकले गुरुजी, शिवसेनेचे सहकार क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिलमिले, माजी युवासेना शहर प्रमुख ललित लांजेवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, शिवसेना शाखाप्रमुख जनार्दन थेटे, नगर सेवा समितीचे दिनकर ढवस, ज्योतीताई साखळकर, विकास जैपुरकर उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी युवासेनेचे राजू पारोडे, मिलिंद बावणे, स्वप्नील ताजने, ध्रुव येरणे, उमेश चेडे, सोमेश्वर गेडेकर, पवन सोनू फाये, सौरभ धानोरकर, अवि राजूरकर, अजय शिवणी, मयूर क्षीरसागर, श्रीकांत सुशोणकर, गोलू सिडाम, संकेत कार्लेकर, संजय कवाडे, प्रितम मत्ते, योगेश मजगवळी, सौरभ चिंचोळकर, चेतन काकडे, अभि नागपुरे, तुळशीराम काकडे, अनिकेत भेंटाले, साकेत भुजबळराव, अविनाश शिवंतीवार, आकाश गोडे, हर्षल बिडकर, गोलू हंसकार, युवराज ताजने, नीरज चौधरीही उपस्थित होते.

Comments are closed.