सावधान.. उद्या दुपारी पर्यंत तालुक्यात वीज पुरवठा राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात बुधवार 10 मे रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 2 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विजेचे संबंधित अत्यावश्यक कार्य सकाळी 8 वाजता पूर्व आटोपून घ्यावे. असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.कडून वणी – वरोरा 220 के. व्ही. लाईन आणि वणी – चंद्रपूर 220 के. व्ही. लाईनची मेंटेनन्स कामामुळे 220 के व्ही. वणी सब स्टेशनवरून वीज पुरवठा बंद करण्यात येईल. तसेच तालुक्यातील 33/11 के. व्ही. मोहोर्ली, राजूर, चिखलगाव, लालगुडा व शिंदोला सब स्टेशनचा वीज पुरवठाही खंडित राहणार. 11 के. व्ही. सुंदरनगर, कोलारपिंपरी, 33 के. व्ही. कायर तसेच झरी तालुक्यातील 33 के. व्ही. अडेगाव व आरसिसिपिएल कंपनीचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.