मटका पट्टीवर धाड पडताच लोकांची पळापळ….

एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार होण्यात यशस्वी

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथे सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या कार्यवाहीत एकाला अटक करण्यात आली तर मटका पट्टी मालक फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. शहद पुनवटकर रा. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मटका पट्टी मालक विजय कंडेवार हा फरार होण्यात यशस्वी झाला.

ठाणेदार अजीत जाधव यांना खबरीद्वारा राजूर येथील तेलगू वार्ड येथील खुल्या सार्वजनिक जागेत वरली मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलीस हवालदार विकास धडसे हे टीम घेऊन राजूर येथे घटनास्थळी गेले असता तिथे त्यांना लोकांची गर्दी आढळून आली. लोक या ठिकाणी पैसे देऊन मटका लावत असल्याचे आढळले.

खात्री झाल्यानंतर वणी पोलिसांच्या चमुने या ठिकाणी धाड टाकली. त्यामुळे लोकांची पळापळ सुरू झाली. या पळापळीत लोकांकडून पैसे घेणारा इसम पोलिसांच्या हाती लागला. तर मटका लावणारे लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शरद पुनवटकर (54) रा. वणी असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याडे 2170 रुपये नगदी व मटका लावण्याचे साहित्य आढळून आले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

चौकशीअंती त्याने सदर मटका हा विजय कंडेवार याचा असून तो 250 रुपये रोजीने काम करतो असे सांगितले. माहितीवरून पोलिसांनी आरोपी विजय कंडेवारचा शोध घेतला. मात्र घटनेनंतर तो फरार झाल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी आरोपी शरद पुनवटकर रा. वणी व फरार आरोपी विजय कंडेवार याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 अ व भादंविच्या कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.