गरजूंना कपडे व साहित्य वाटून दिवाळी साजरी

स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळीनिमित्त गरजूंना वॉटर सप्लाय वणी व सोनूपोड, गावपोड, सालईपोड येथे गरजूंना कपडे व साहित्य वाटपा करण्यात आले. 300 पेक्षा अधिक गरूजू्ंनी याचा लाभ घेतला. स्माईल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. गरजूंना नवीन साड्या, जीन्स, पॅन्ट, छोट्या मुलांचे नवीन कपडे, चादर, शाल, नवीन शूज इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. यातील 90 टक्के वस्तू या नवीन तर उर्वरीत वस्तू सुस्थितीतील होत्या. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्माईल फाउंडेशनच्या वतीने लोकसहभाग व दानशुरांच्या मदतीने कपडे व साहित्य गोळा करण्याचे काम सुरु होते. मोठ्या प्रमाणात कपडे व साहित्य जमा झाल्यानंतर या साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, घनश्याम हेपट, मयूर भरटकर, राज भरटकर, कार्तिक पिदुरकर, विष्णु घोगरे इत्यदी सदस्य उपस्थित होते.

Podar School 2025

Comments are closed.